आपल्या मंगलमय वास्तुला अधिक ऊर्जावान
पवित्र बनवण्यासाठी लक्ष्मी प्रवेशासाठी सुख-समृद्धीदायक
वास्तुशास्त्रानुसार तयार लाकडी उंबरठा
सन २०२४ मध्ये वास्तुज्योतिष अभ्यासक मंडलिक काका यांनी वास्तु उंबरठ्याची संकल्पना जगासमोर नव्याने आणली. अनेक जुन्या वास्तुग्रंथांचा अभ्यास करून द्वार शुद्धीसाठी मुख्य प्रवेशद्वारातील वास्तुदोषांचे निवारण करण्याचा उद्देशाने वास्तू उंबरठा तयार करण्यात आला. उंबरठा संस्कार करताना त्याखाली सात प्रकारची माती, दहा प्रकारचे औषधी वनस्पती, उंबरठ्यामध्ये मौल्यवान माणिक मोती, पोवळा, पुष्कराज, पाचू ही पंचमहारत्न त्यासोबत पंचमहाभूतांचे प्रतिक असलेली स्वस्तिक तांब्याची पट्टी, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह करणारी चांदीची तार, मंडलाकार ऊर्जेचे प्रतिक असलेले गोमती चक्र, मंगळाचे प्रतिक असलेले खैराची पट्टी, हिमालयातील पवित्र गंगाजल, पंचउर्जेचे प्रतिक असलेले पंचमहाफुलांचा पंचपुष्य रस याचा उपयोग करून मुख्य प्रवेशद्वारात सकारात्मक ऊर्जेची अधिक स्पंदने निर्माण व्हावीत यासाठी वास्तुउंबरठा तयार करण्यात आला. या उंबरठ्यावरील लक्ष्मी पाऊल, स्वस्तिक, कमळ ही शुभचिन्हे मुख्य प्रवेशद्वारातील प्रसन्नता वाढवतात.
उंबरठा संस्कार हा आपल्या घरासाठी अतिशय पवित्र संस्कार आहे आणि त्यामुळे वास्तुदोष कमी होण्यास मदत होते.
मुख्य प्रवेशद्वारात वास्तुशास्त्रानुसार उंबरठा संस्कार केला जातो. भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेला उंबरठा घर आपल्या घराचे रक्षण करतो. उंबरठ्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. उंबरठ्याचे पूजन केल्याने लक्ष्मीची कृपा होऊन लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते. लाकडी उंबरठा सोबत मौल्यवान पंचरत्न, दुर्मिळ वनस्पती, चांदीची तार, सात प्रकारची माती, पाच प्रकारच्या फुलांचा रस, तांब्याची स्वस्तिक पट्टी ठेवल्याने मुख्य प्रवेशद्वारातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. उंबरठा बसविल्याने घराची चौकट पूर्ण होते. उंबरठा हा लाकडापासून तयार केलेला असावा कारण त्यात नैसर्गिक ऊर्जा शोषून घेणारे व समतोल ठेवणारे असे वृक्षतत्त्व असते.उंबरठ्यामुळे घरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांना प्रतिबंध होतो. नववधू घरात पहिले पाऊल त्याच उंबरठ्यावरून टाकते. उंबरठा म्हणजे संरक्षण, संस्कार, मर्यादा आणि सीमारेषा.
सध्याच्या काळात फ्लॅट संस्कृतीत मुख्य प्रवेशद्वार मिळत नाही. आठ दिशा, ब्रह्मस्थान, प्रवेशद्वार यात काही ना काही वास्तुदोष आढळतो, फ्लॅट संस्कृतीत दरवाजा हा नेहमी आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य यापैकी एका दिशेला येतो. उपदिशेला दरवाजा आल्यामुळे गंभीर प्रकारचे वास्तुदोष तयार होतात. वास्तुउंबरठा बसविल्यामुळे मुख्य प्रवेशद्वारात सकारात्मक ऊर्जेची अधिक स्पंदने तयार होतात त्यामुळे वास्तुदोष कमी होतात. दरवाजासमोर काही वेध आला, विथीशुला आली तर त्या त्याचाही दोष उंबरठ्यामुळे कमी होतो. आणि उंबरठ्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते . अष्टलक्ष्मीचा वास सदैव त्या घरात राहतो.
म्हणूनच उंबरठा संस्कार हा वास्तूमध्ये खूप महत्त्वाचा असून त्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान, धनधान्य व आरोग्य सदैव वास करत राहते.
वास्तुशास्त्रातील काही जुन्या ग्रंथांमध्ये खैर, देवदार, श्रीपर्णी, सागवान इत्यादी वनस्पतींचा उपयोग घरबांधणी करताना करावा याचा उल्लेख सापडतो. तसेच या वृक्षामुळे घराचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. आम्ही वास्तु उंबरठा तयार करताना सर्वात मजबूत, टिकाऊ अशा उत्तम प्रकारच्या सागवानी लाकडांचा उपयोग करतो. सागवानी लाकडाला दीर्घ आयुष्य असते. पाण्यामुळे हे लाकूड लवकर खराब होत नाही. या लाकडावर डिझाईन आणि पॉलिश उत्तम प्रकारे करता येते. आम्ही सागवानी उंबरठ्यामध्ये खैर या वनस्पतीची पट्टी बसून देतो कारण खैर ही अतिशय पवित्र व दुर्मिळ वनस्पती आहे. या वनस्पतीमुळे आपल्या घराचे नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते. त्यामुळे लाकडी उंबरठा हा घरासाठी अतिशय उर्जावान असतो. वृक्षआयुर्वेदानुसार कोणताही वृक्षछेद करताना त्याचा वृक्षछेदन विधी सांगितलेला आहे. विधी पूर्वक क्षमा मागून आणि पूजा करून त्या वृक्षाचे छेदन करावे असा उल्लेख आढळतो. आम्ही उंबरठा तयार करण्यापूर्वी लाकडाचे शुध्दीकरण अभिमंत्रण करूनच ते लाकूड उंबरठा तयार करण्यासाठी वापरतो. आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या नवीन लाकडापासूनच उंबरठा तयार केला जातो. जुन्या घराचे किंवा वापरलेले लाकडामुळे फार मोठा वास्तूदोष निर्माण होऊ शकतो, म्हणून आम्ही कोणतेही जुन्या घराचे अथवा वापरलेले लाकूड यासाठी वापरत नाही.
म्हणूनच उंबरठा तयार करताना तो सागवान, देवदार, शिसम, श्रीपर्णी आणि खैर यापासूनच तयार केलेला असावा.
शुभमुहूर्तावर आपल्या सोयीप्रमाणे उंबरठा पूजन आपण करू शकतो. उंबरठा पूजन करताना रत्नांचे शुद्धीकरण, अभिमंत्रण केले जाते. गंध, अक्षता, फुल, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून मुख्य प्रवेशद्वाराची पूजा केली जाते. वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी ही उंबरठा पूजन करू शकतो. गुरुजी मिळाले नाही तरी आपण स्वतः उंबरठ्याचे पूजन करू शकतो. उंबरठा सामग्री कीटमध्ये उंबरठा बसविण्याचे आवश्यक साहित्य पाठवले जाते. त्यासोबत शुभमुहूर्त, उंबरठा विधिवत बसवण्याचे व्हिडिओ ऑर्डर केल्यानंतर आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठविला जातो. उंबरठा बसविताना आपण त्याला स्क्रू फिटिंग अथवा केमिकल यांचा उपयोग करून उंबरठा कारपेंटर कडून बसवू शकतो.
शुभं भवंतु ||
(लाकडाची शुद्धीकरण, अभिमंत्रण करून उत्तम प्रकारची पॉलिश केलेला स्वस्तिक, लक्ष्मी पाऊले, कमळ शुभचिन्हांकीत उंबरठा )
उंबरठा साईज |
---|
३ फूट लांब x ३ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ३ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ४ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ५ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ६ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ७ इंच रुंद x १.५ इंच उंच |
(लाकडाची शुद्धीकरण, अभिमंत्रण करून उत्तम प्रकारची पॉलिश केलेला स्वस्तिक, लक्ष्मी पाऊले, कमळ शुभचिन्हांकीत उंबरठा )
उंबरठा साईज |
---|
३ फूट लांब x ३ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ३ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ४ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ५ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ६ इंच रुंद x १.५ इंच उंच |
३ फूट लांब x ७ इंच रुंद x १.५ इंच उंच |